
सांगलीतील ऐतिहासिक बैलगाडा शर्यतीत दोन बैलजोड्यांनी पटकावला प्रथम क्रमांक; मंत्रालयात होणार विजेत्यांचा सत्कार
सांगली, दि. ०९ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : सांगलीतील तासगाव-बोरगावजवळ कोड्याचा मळा येथे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या वतीने आयोजित ‘श्रीनाथ केसरी’ बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा रोमांच घेऊन आली. दोन फॉर्च्यूनर, २ थार, ७ ट्रॅक्टर आणि १५० दुचाकी अशा आकर्षक बक्षिसांसाठी राज्यभरातील हजारो बैलजोड्या या ५०० एकरच्या मैदानावर धावल्या.

‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि ‘ब्रेकफेल’ या जोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक फॉर्च्यूनर गाडी जिंकली. तर, दुसऱ्या फॉर्च्यूनर गाडीचा मान लखन आणि सर्जा या बैलजोडीने मिळवला. या विजयाने एका सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात मोठा आनंद आणला.
सर्जाने फेडले मालकाचे पांग:
विशेषतः सर्जा या बैलाने सर्वांचे लक्ष वेधले, कारण त्याचा मालक हिंगोली जिल्ह्यातील दांडेगावचा एक सामान्य शेतकरी आहे. तब्बल ५०० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या मालकाने सर्जाच्या विजयानंतर भावनिक प्रतिक्रिया दिली.
“सकाळपासून आमच्या बैलापाशी कोणी आलं नाही. गरिबाच्या दावणीचा बैल असल्याने त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. सगळे कॅमेरे हे मोठ्या नावाजलेल्या बैलांपाशी घुटमळत होते. मात्र, या शर्यतीत माझ्या सर्जाने मैदान मारले आणि पांग फेडले,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
आपल्या विजयानंतर बोलताना त्यांनी फॉर्च्यूनरही काळ्या रंगाचीच मागणार असल्याचे सांगितले. बक्षीस घ्यायला आता मंत्रालयात जायला मिळणार असल्याचा आनंदही त्यांनी बोलून दाख