डिजिटल सुरक्षिततेसाठी DoT चा ‘संचार साथी’ उपक्रम; कोट्यवधी मोबाईल ग्राहकांना फसवणुकी पासून संरक्षण

नागरिक-केंद्रित प्लॅटफॉर्ममुळे डिजिटल युगात ग्राहक अधिक सुरक्षित आणि सशक्त

मुंबई, दि. ०८ नोव्हेंबर  : देशातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहक, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) ‘संचार साथी’ हा महत्त्वाकांक्षी आणि नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे.

‘संचार साथी’ म्हणजे काय?

‘संचार साथी’ हा एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे नागरिक खालील सुविधा वापरू शकतात:कनेक्शनवरील नियंत्रण: वापरकर्त्यांना त्यांच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन सक्रिय आहेत, याची माहिती मिळते आणि अनधिकृत कनेक्शन त्वरित बंद करण्याची विनंती करता येते.

  • फसवणुकीपासून संरक्षण: हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करण्याची आणि त्यांचा शोध घेण्याची सुविधा मिळते.
  • सुरक्षा धोक्यांची नोंद: सायबर फसवणूक किंवा सुरक्षा धोक्यांची तक्रार करण्याची सोपी पद्धत उपलब्ध झाली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे देशातील नागरिक डिजिटल युगात अधिक सुरक्षित, सजग आणि सशक्त बनत आहेत. ‘संचार साथी’ हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा खरा साथीदार ठरत असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
सायबर सुरक्षिततेबाबत आवाहनमुंबई एलएसएच्या दूरसंचार विभागाचे संचालक विनय जांभळी आणि उपमहासंचालक (डीडीजी) सुमनेश जोशी यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आणि या डिजिटल साधनांचा प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन केले आहे.नागरिकांनी अधिक माहितीसाठी www.sancharsaathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button