सांगलीच्या प्रभाग १६ मध्ये आधुनिक व्यायाम शाळेचे लोकार्पण सोहळा; आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ; युवकांसाठी तंदुरुस्तीचे नवे केंद्र

स्थानिक विकास निधीतून ८ लाख ८० हजार निधी मंजूर

सांगली, दि. ०८ नोव्हेंबर :प्रभाग क्रमांक १६ मधील क्रांती कला क्रीडा व्यायाम मंडळ येथे स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे बांधकाम व साहित्य खरेदी कामाचा शुभारंभ सोहळा आज उत्साहात पार पडला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.या कामासाठी स्थानिक विकास निधीतून ८ लाख ८० हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.आरोग्य क्रांतीची सुरुवात.

यावेळी बोलताना आमदार गाडगीळ यांनी विश्वास व्यक्त केला की, या आधुनिक व्यायामशाळेमुळे परिसरातील युवकांना शिस्त, आत्मविश्वास आणि तंदुरुस्तीचा नवा उत्साह मिळेल. “जनतेच्या सहकार्याने आणि विकासाभिमुख विचाराने बांधलेली ही आधुनिक सुविधा युक्त व्यायाम शाळा नव्या आरोग्यक्रांतीची सुरुवात ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या सोहळ्यास माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ. स्वातीताई शिंदे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात, उत्तम साखळकर, पापा बागवान, माधुरीताई वसगडेकर, महेश सागरे, आनंदा चिकोडे, भाजपा अनुसूचित जाती युवा मोर्चा सांगली अध्यक्ष अमित भोसले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अत्याधुनिक सुविधेमुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांमध्ये, विशेषतः युवा वर्गात, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button