कवठेमहांकाळच्या रांजणी येथे ‘ड्रायपोर्ट’ उभारणीसाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करणार – मंत्री नितेश राणे

स्थानिक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

मुंबई/सांगली, दि. ०७ नोव्हेंबर  : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ‘ड्रायपोर्ट’ (Dry Port) अर्थात आंतरदेशीय कंटेनर डेपो व्हावा, या स्थानिक मागणीसंदर्भात आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री राणे यांनी रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारणीसाठी सकारात्मकता दर्शवली. या भागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक, शेतकरी आणि नागरिकांची ही मागणी योग्य असून, या मागणीचा केंद्रीय स्तरावर तातडीने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ड्रायपोर्टमुळे सांगली जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला आणि येथील शेतीमाल तसेच उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.

या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपकुमार हे उपस्थित होते. तसेच, आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) या चर्चेत सहभागी झाले होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button