सांगलीतील आयर्विन पुलाच्या समांतर पर्यायी पुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून सुटका, विकासाला नवी गती

अर्थसंकल्पीय बजेट अंतर्गत आमदार सुधिरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ३५ कोटी ५० लाख रुपये निधीतून या पुलाची उभारणी

सांगली, ६ नोव्हेंबर : सांगली शहरवासियांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुप्रतिक्षित असलेल्या सांगली आयर्विन पुलाच्या समांतर पर्यायी पुलाचा भव्य लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. अर्थसंकल्पीय बजेट अंतर्गत आमदार सुधिरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ३५ कोटी ५० लाख रुपये निधीतून या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या पुलाचे महत्त्व अधोरेखित केले. “हा समांतर पर्यायी पूल हा केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर जनतेच्या आत्मविश्वासाचा पूल आहे,” असे ते म्हणाले. दररोजच्या प्रवासात नागरिकांना होणारा त्रास कमी करून, अधिक सुरक्षित आणि सुलभ मार्ग देण्याचे वचन आज पूर्ण झाले आहे. या पुलामुळे परिसरातील नागरिकांना नव्या सोयी, व्यवसायांना गती आणि विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक विकास कामामागे जनतेचा आशीर्वाद आणि शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो, असेही ते म्हणाले.

यावेळी मिरज विधानसभा आमदार व माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकारणी पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चाचे सदस्य, माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ केंद्र प्रमुख, आदी प्रशासकीय अधिकारी आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button