
मुंबई/सांगली, ६ नोव्हेंबर : आगामी सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे निवडणुकीच्या रणनीतीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे साहेब, मंत्री मा. हसनजी मुश्रीफ साहेब, आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सखोल विचारमंथन करून प्रभावी रणनीती आखण्यात आली.

महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश या बैठकीदरम्यान, पक्षासाठी आणखी एक महत्त्वाचा दिवस ठरला. कै. माजी आमदार शरद पाटील सर यांचे पुतणे मा. संजय पाटील (संगाजे) आणि सामाजिक कार्यकर्ते मा. संजय कोलप यांनी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे सांगली शहरात पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मा. पद्माकर जगदाळे सर, प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक श्री. विष्णू अण्णासाहेब माने, माजी महापौर मा. दिग्विजय सूर्यवंशी, मा. आकाश माने, मा. राधिका हरगे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून, नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत.
