
पनवेल/कळंबोली, ६ नोव्हेंबर : बहुजन नायक आमदार मा. श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. विजयशेठ खानावकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विजयशेठ खानावकर यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. दि.०४ नोव्हेंबर रोजी कळंबोली (ता. पनवेल) येथे आमदार पडळकर साहेब यांनी खानावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी विजयशेठ खानावकर, दिलीपशेठ खानावकर, किशोर दादा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जात-धर्म-पक्ष पलीकडील मैत्री आमदार पडळकरांनी जात, धर्म किंवा पक्ष-पार्टी याच्या पलीकडे जाऊन मैत्रीचा वसा जोपासणारे नेते असल्याची प्रचिती या भेटीतून पुन्हा एकदा दिली. ‘आई ही आई असते, ती आपला जीव असते’, हा संदेश देत त्यांनी खानावकर कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगी त्यांच्यासोबत उभे राहून भावनिक आधार दिला. प्रत्येक समाजातील लोकांना आपले मानून जीव लावणारे नेते म्हणून बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर यांनी खानावकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्यावरील आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला. त्यांच्या या सांत्वनपर भेटीमुळे खानावकर कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
