गुरुवारी सांगली आयर्विन समांतर पुलाचा भव्य लोकार्पण सोहळा

३५.५० कोटी निधीतून पूल साकार

सांगली, ता.५: सांगली शहर व परिसरात वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या आयर्विन पुलाला समांतर बांधण्यात आलेल्या पर्यायी पुलाचा भव्य लोकार्पण सोहळा गुरुवारी ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून अर्थसंकल्पीय बजेट अंतर्गत मंजूर झालेल्या ३५ कोटी ५० लाख रुपये इतक्या मोठ्या निधीतून या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

या बहुप्रतिक्षित पुलाचे लोकार्पण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

लोकार्पण सोहळ्याची माहिती:स्थळ:

आयर्विन पुल, टिळक चौक, हरभट रोड, सांगली.दिनांक: गुरुवार, ०६ नोव्हेंबर २०२५.वेळ: सायंकाळी ठीक ०५ वाजता.

या लोकार्पण सोहळ्याला सर्व भाजपचे जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, तसेच मंडल अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या समांतर पुलामुळे सांगली शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button