हॉटेल, परमिटरूममधील गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस अधीक्षकांची बैठक; ‘ हत्यारबंद ग्राहक टाळा, सुरक्षारक्षक नेमा’

सांगली, ता. ४ नोव्हेंबर : शहरातील हॉटेल, बार आणि परमिटरूम परिसरात होणारे गंभीर गुन्हे व गैरप्रकार रोखण्यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक (SP) संदीप घुगे यांनी हॉटेल चालक-मालकांची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. हॉटेलच्या परिसरात विनापरवाना मद्यपान करून किंवा नशेत कोणताही गुन्हा घडल्यास त्यासाठी हॉटेलचालक-मालकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा सक्त इशारा अधीक्षक घुगे यांनी यावेळी दिला.

बैठकीची पार्श्वभूमी:

नुकत्याच विश्रामबाग परिसरातील ‘व्हाईट हाऊस’ हॉटेलमध्ये मित्राने मित्राचा खून केल्याच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.


अधीक्षकांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना:
२१ वर्षाच्या आतील व्यक्तीस बंदी
:२१ वर्षाच्या आतील व्यक्तीने मद्य विक्री करू नये.
हत्येरांसह प्रवेश टाळा: हॉटेल किंवा बार परिसरात हत्यारबंद ग्राहक येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
सुरक्षारक्षक नेमा: गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रशिक्षित सुरक्षारक्षक (Security Guards) नेमावेत.
एकच प्रवेशमार्ग: हॉटेलमध्ये ग्राहकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग (Entry-Exit) एकच असावा.
परवानाधारक मद्यविक्री: परवाना असल्याशिवाय मद्यविक्री करू नये. परवान्याचे वेळेवर नूतनीकरण करावे.
सीसीटीव्ही (CCTV): हॉटेलच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू स्थितीत ठेवावेत.
खुलेआम मद्यपानास मज्जाव: उघड्यावर मद्यपान करणाऱ्या व्यक्तींची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी.

चाकू, तलवार, कोयताधारकांना प्रवेश नाही: चाकू, तलवार किंवा कोयता घेऊन येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये.

वाईन शॉपमध्ये मद्यविक्रीकरताना नियमांचा भंग केला जात आहे. त्यातून ओपन बारचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वाईन शॉप चालकांनी एकाच व्यक्तीला मोठ्या प्रमाणात मद्यविक्री करू नये.


इशारा:

अधीक्षक घुगे यांनी स्पष्ट केले की, “एखाद्या व्यक्तीने परवाना नसताना मद्यपान करून अथवा उघड्यावर मद्यपान करून गुन्हा केल्यास, मद्यविक्री करणाऱ्या चालक-मालकांनाही जबाबदार धरले जाईल.” मद्यपान करून नशेत होणारे गंभीर गुन्हे आणि अवैध दारू विक्रीच्या घटना रोखण्यासाठी हा कठोर पवित्रा घेण्यात आला आहे.

या बैठकीला पोलीस उपाधीक्षक संजय मोरे, प्रणिल गिल्डा यांच्यासह विश्रामबाग, महात्मा गांधी चौकी, सांगली शहर आणि सांगली, कुपवाड एमआयडीसी पोलीस चौकी,संजयनगर पोलीस चौकी आणि सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी खाद्यपेय विक्रेता मालक-चालक असोसिएशनचे अध्यक्ष लहू भडेकर, उपाध्यक्ष मिलिंद खिलारे आणि सचिव रमेश शेट्टी यांनी व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button