सांगली निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांचे आरक्षण अंतिम; प्रारूप आरक्षणात कोणताही बदल नाही

– उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांची माहिती

सांगली, ता.३: सांगली जिल्ह्यातील ६१ निवडणूक विभाग आणि १२२ निर्वाचक गणांसाठी निश्चित करण्यात आलेले प्रारूप आरक्षण अखेर अंतिम करण्यात आले आहे. या प्रारूप आरक्षणावर दाखल झालेले सर्व ७३ आक्षेप विभागीय आयुक्त, पुणे यांनी नामंजूर केल्यामुळे आरक्षणाच्या सोडतीत कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांचे हे आरक्षण आज, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम करण्यात येत आहे.

७३ आक्षेप नामंजूर

राज्य निवडणूक आयोगाच्या १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार, सांगली जिल्ह्यातील ६१ निवडणूक विभाग आणि १० तालुक्यांमधील १२२ निर्वाचक गणांसाठी अनुसूचित जाती (SC), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC), तसेच महिलांसाठी असलेल्या सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गाकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, सांगली येथे १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षणाची सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर १४ ते १७ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या काळात एकूण ७३ आक्षेप दाखल झाले होते.
मात्र, विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी हे सर्व ७३ आक्षेप नामंजूर केले आहेत. त्यामुळे आरक्षणाचा प्रारूप आराखडा पूर्णपणे कायम ठेवण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी स्पष्ट केले. आता हे आरक्षण पुढील कालावधीसाठी अंतिम मानले जाईल.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button