रस्त्यावर कचरा टाकल्यास मोठा दंड, व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर शेअर होणार

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास कठोर कारवाई सुरू

सांगली , ता.३ : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका (SMKC) क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहराची स्वच्छता भंग करणाऱ्या नागरिकांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर आता अत्यंत कठोर दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या थेट आदेशानुसार ही विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

भरारी पथकाकडून ‘ऑन-द-स्पॉट’ कारवाई

उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता) श्रीमती स्मृती पाटील यांच्या नियोजनाखालील विशेष ‘भरारी पथक’ महानगरपालिका क्षेत्रात सक्रिय झाले आहे. हे पथक उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर थेट आणि तात्काळ कारवाई करत आहे.

कारवाईचे स्वरूप:

  • कचरा टाकणाऱ्या संबंधित व्यक्तींचे फोटोशूट (Photo Shoot)व्हिडिओ रेकॉर्डिंग (Video Recording) केले जाईल.
  • चित्रीकरणानंतर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल.
  • सार्वजनिक नामुष्की टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, कारण चित्रीकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केले जाणार आहेत.

“प्रत्येक नागरिकाने आपला रोजचा कचरा केवळ घंटागाडीमध्येच टाकावा. अपार्टमेंटमधील नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्र करून, तो काळ्या पिशवीत बांधावा. कोणत्याही परिस्थितीत कचरा रस्त्यावर, मोकळ्या जागेत किंवा नाल्यात टाकून शहर अस्वच्छ करू नये.”

“शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करा. शहर आपले आहे, ते स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. कठोर दंडात्मक कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येऊ देऊ नका.”

मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button