
कुपवाड, ता.३: माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू अण्णासाहेब माने यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ८ मधील एका महत्त्वाकांक्षी रस्ते कामाचा शुभारंभ सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यानगर गल्ली क्रमांक ६, चिंतामणी रेसिडेन्सी अपार्टमेंट येथून रजपूत घर, सत्य साईनगर ते जिजामाता कॉलनीपर्यंतच्या ६० फुटी रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाचे औपचारिक उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले. या रस्ते डांबरीकरणामुळे या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, रस्त्यांची गुणवत्ता सुधारून वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण शुभारंभ सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर, नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष आकाश माने, सांगली शहर महिला अध्यक्ष राधिका ताई हारगे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने यांच्या पाठपुराव्यामुळे हे रस्ते काम मार्गी लागल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी यावेळी विशेष समाधान व्यक्त केले आणि त्यांचे आभार मानले. माने यांनीही या भागाचा विकास हे आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी उद्योगपती तात्यासाहेब खोत, संजय पाटील, मेघदूत ढगे, मा. विकास जाधव, मोहनसिंग रजपूत, जितेंद्र हेगडे, संजय कबुगडे, यश साळुंखे, नेमगोंड पाटील, कांतिलाल मारवाडी साहेब, शीतल मदिवाळे, अजय पवार, शुभम लाड, सागर पाटील, शशिकांत गायकवाड साहेब, रुपसिंग राजपूत, जग्गनाथ रुपणर, धोंडीराम मोंडकर, आशिष वाघमारे, Adv. सुधीर गडदे, सुमित पाटील, जयश्रीताई पाटील, रजनी राजपूत मॅडम, शीतल देशमुख, गणेश पुणेकर, विजय भाऊ जाधव (सराफ असोसिएशन अध्यक्ष), धोंडीराम अण्णा माने, बक्षी सर, साळूंखे सर, रमेश जावीर, संभा रजपूत, KD पाटील काका, राजू पोतदार, कैलास भगत, प्रदीप वायचळ, आप्पा नवठार काका, शंकर वनखंडे, बाळू खांडेकर, संभाजी मुळीक, प्रशांत बोंद्रे, भारत डुबूल, दिलीप पाटील, स्वप्नील पाटील, प्रथमेश हेगडे, बिडकर साहेब, राजू राजपूत, भालुसिंग रजपूत, विलास पाटील, इंद्रनील ढगे, विलास छत्रे, सावत्रे काका, मोहन पाटील, राजू पाटील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.