ऐतिहासिक यश! सांगली महापालिकेच्या ‘अभय योजना’तून १५.६० कोटींची विक्रमी वसुली

सांगली (प्रतिनिधी)

सांगली, ता.१: मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी राबवलेली पाणीपट्टी “अभय योजना” विक्रमी यशस्वी ठरली आहे. दिनांक ६ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२५ या अडीच महिन्यांच्या कालावधीत २७,८८३ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, मनपाच्या तिजोरीत तब्बल १५ कोटी ६० लाख रुपये इतकी मोठी रक्कम जमा झाली आहे. या योजनेमुळे थकबाकीदार नागरिकांना एकूण ५ कोटी ९१ लाख रुपयांचे विलंब शुल्क माफ झाले असून, नागरिकांनी या सुवर्णसंधीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महापालिकेच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला आहे.

अंतिम दिवशी २.५० कोटींची विक्रमी वसुली
महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, योजनेच्या अंतिम दिवशी (दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५) नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. या एकाच दिवशी २ कोटी ५० लाख रुपये इतकी विक्रमी पाणीपट्टी वसूल करण्यात आली, ज्यामुळे योजनेच्या यशाची नोंद झाली आहे.

योजनेची प्रमुख आकडेवारी (३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत): तपशीलआकडेवारी
लाभ घेतलेले एकूण नागरिक
२७,८८३
एकूण वसूल रक्कम
₹ १५.६० कोटी
१००% माफ झालेले विलंब शुल्क
₹ ५.९१ कोटी

आयुक्तांचे आभार आणि उर्वरित थकबाकीदारांना आवाहन
अभय योजनेच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेतील उपायुक्त (मालमत्ता कर व इतर) श्रीमती अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता कर व इतर) श्री. आकाश डोईफोडे, अधीक्षक श्रीमती महादेवी कुरणे, तसेच पाणीपुरवठा आणि महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
महापालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. त्याचबरोबर, ज्या नागरिकांनी अद्याप पाणीपट्टी भरली नाही, त्यांना विलंब शुल्कासह त्वरित भरणा करून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ‘अभय योजनेची मुदत समाप्त झाली आहे, त्यामुळे आता दंड माफ होणार नाही,’ असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button