कुपवाडच्या विकासाला गती! उपमुख्यमंत्र्यांच्या ५० कोटींच्या निधीतून महत्वाकांक्षी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

सांगली, ता.१: राज्याचे उपमुख्यमंंत्री, मा. अजित दादा पवार यांनी सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी मंजूर केलेल्या ५० कोटी रुपयांच्या भरीव निधीतून, सांगली शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. या निधीचा वापर करून प्रभाग क्रमांक ८ मधील एका अत्यंत महत्वाकांक्षी रस्ते कामाचा शुभारंभ समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या विकासकामाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचा रस्ता उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे वाहतूक आणि दैनंदिन जीवनातील प्रवासाची समस्या दूर होण्यास मदत होईल. प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले विद्यानगर गल्ली क्रमांक ६ ते रजपूत घर ते सत्य साईनगर, जिजामाता कॉलनी येथील ६० फुटी रोडचे हॉटमिक्स डांबरीकरण हे काम या ५० कोटींच्या निधीतून केले जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर विद्यानगर परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल.  या कामाचा शुभारंभ रविवार २ नोव्हेंबर २०२५सकाळी ९.३० वाजताविद्यानगर, गल्ली क्रमांक ६, प्रभाग क्रमांक ८  येथे होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्यचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सां.मि.कु. महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मा. विष्णू आण्णासाहेब माने यांच्या वतीने परिसरातील नागरिकांना या विकासकामाच्या शुभारंभ समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button