जत आरटीओ कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी २८ लाखांचा निधी मंजूर

जत तालुक्याच्या विकासाला नवी गती

जत, ता. ३१: जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जत येथील एम.एच. ५९ आर.टी.ओ. (प्रादेशिक परिवहन कार्यालय) कार्यालयाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी एकूण ₹२८ लाख रुपये एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. 

या निर्णयामुळे जत तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळणार असून, आर.टी.ओ. कार्यालयाचे लवकरच अधिक सुसज्ज आणि जनसुलभ केंद्रात रूपांतर होणार आहे. हा निधी स्थानिक जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. नवीन निधीमुळे आर.टी.ओ. कार्यालयातील आवश्यक सुविधा वाढण्यास मदत होणार असून, नागरिकांची कामे जलद गतीने होण्यास उपयुक्त ठरणार आहे. कार्यालयाचे सुशोभीकरण झाल्यानंतर परिसराचे स्वरूप अधिक आकर्षक आणि कार्यक्षम होईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button