भिलवडीजवळ भीषण अपघात; टँकर-मोटार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

चालक गंभीर जखमी; हजारवाडी येथील घटना

भिलवडी, ता. ३१: तासगाव-भिलवडी मार्गावरील हजारवाडी (ता. पलूस) येथे एचपी गॅस प्लँटजवळ आज (३१ ऑक्टोबर) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दूध वाहतूक करणारा टँकर आणि मोटार (कार) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारीतील दोन तरुण जागीच ठार झाले, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.


अधिक आनंदा शिंदे (वय २८) आणि अॅड. ओंकार बंडोपंत हिंगमिरे (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. चालक आशुतोष विठ्ठल जाधव (वय २५) हा गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोटार (एमएच १० इके ८००५) मधील सर्व जण बोरगावहून भिलवडी स्टेशनच्या दिशेने जात होते. दुपारी अडीचच्या सुमारास हजारवाडी येथील गॅस फॅक्टरीनजीक मोटार चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या टँकरला मोटारीने जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की, मोटारीच्या डाव्या बाजूला बसलेले अधिक शिंदे आणि अॅड. ओंकार हिंगमिरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी चालक आशुतोष जाधव याला रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. पुढील तपास भिलवडी पोलीस करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button