सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन; सरदार पटेलांच्या १५०व्या जयंतीनिमित्त एकता दौड


सांगली, ता. ३१: राष्ट्रीय एकता दिन व लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे ‘रन फॉर युनिटी’ (एकता दौड) चे आयोजन करण्यात आले. या एकता दौडीचा मुख्य उद्देश देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम ठेवण्याचा संदेश समाजात पोहोचवणे हा होता. सरदार वल्लभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या ‘रन फॉर युनिटी’मध्ये सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, अंमलदार, जवान, नागरिक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या दौडीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश सांगली शहरात घुमला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button