
नांद्रे, ता.३१: सांगली विधानसभा मतदारसंघातील नांद्रे गावासाठी शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या ०२ कोटी ६७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ सोहळा आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या मंजूर निधीमधून प्रामुख्याने गावातील अंतर्गत रस्ते करणे, गटारी बांधणे यासह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे. या कामांमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार असून नागरिकांच्या सुविधांमध्ये भर पडणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यास नांद्रे गावच्या सरपंच सौ. पुजाताई भोरे, उपसरपंच शितलकुमार कोथळे, चेअरमन राहुल सकळे, ग्रामपंचायत अधिकारी सचिन पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि नांद्रे गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन विकास कामांच्या सुरुवातीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.