
आरग : मिरज पूर्व भागातील आरग, बेडगसह परिसरातील ग्रामस्थांना राज्य शासनाच्या विविध सवलती व योजनांची माहिती देण्यात आली. या जनजागृती अभियांनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध योजनांची माहिती असणारे माहिती पत्रक वाटण्यात आले.
शासनाच्या विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान सुरू केल्याची माहिती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी दिली.
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. असे आवाहन करण्यात आले.
महिलांना बस सेवा मध्ये पन्नास टक्के सवलत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, विधवा पेन्शन योजना, रमाई आवास घरकुल योजना, पिंक ई रिक्षा योजना,मुलींना उच्च शिक्षण मोफत, गाई म्हशी गोठा योजना, बांधकाम कामगार योजना अश्या विविध योजनाची माहिती देण्यात आली.