सांगली /प्रतिनिधी

सांगली, ता.३१: महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यस्तरीय संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी माणगांवे यांचा भव्य सत्कार सोहळा हॉटेल ककून, सांगली येथे उत्साहात पार पडला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी रवींद्रजींना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग आणि शेती क्षेत्राला एकाच छताखाली आणून, “आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रगती” या ध्येयाने MACCIA नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.

या सत्कार सोहळ्यास जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात आमदार राजेंद्र यड्रावकर, दीपक बाबा शिंदे-म्हैशाळकर, नीताताई केळकर, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रकाश ढंग, रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील यांचा समावेश होता.

MACCIA संस्थेतील पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात चेअरमन, ट्रस्ट बोर्ड MACCIA आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकरन शेट्टी, महा. उपाध्यक्ष रमाकांत मालू, गिरीष चितळे, प्रमोद चौगुले, रमेश आरवाडे, रौनक शहा, शरद नलवडे आदी सांगली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना उपस्थित होत्या.