‘महा-TET परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडावी’; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे निर्देश


सांगली, ता.३१: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-TET) २०२५ च्या आयोजनासाठी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी आणि ही परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजनाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-TET) २०२५ च्या संचालनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.


या बैठकीस डाएट प्राचार्य विकास सलगर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी नागेश ठोंबरे, जोतिराम पाटील, प्रकाश खेडकर, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व सर्व केंद्र संचालक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी परीक्षा कालावधीत गोपनियता आणि सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विद्यार्थी, पालक व नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वायफाय सिंग्नल, जॅमर इत्यादी उपकरणांना पूर्णतः मनाई असेल.
परीक्षा केंद्रांवर सर्व आवश्यक भौतिक सुविधा, मनुष्यबळाची नियुक्ती आणि स्वच्छतागृह इत्यादी अद्ययावत असावे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तळमजल्यावर स्वतंत्र व सोयीस्कर बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करून त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी उपस्थित ठेवण्यात येणार आहेत.

सांगली जिल्ह्यातील परीक्षा केंद्र व विद्यार्थी संख्या सांगली जिल्ह्यामध्ये महा-TET २०२५ परीक्षेसाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.
पेपर क्रमांकप्रविष्ट विद्यार्थी संख्या
पेपर-१ (५०८७ )पेपर-२ (७१९९) एकूण१२,२८६ जिल्ह्यात एकूण २७ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून सुमारे ७५६० परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button