पाणी बिल ‘अभय योजनेचा’ आज शेवटचा दिवस; थकबाकीदारांना विलंब शुल्कात १००% माफी!

सांगली, ता.३१ : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेद्वारे राबवण्यात येत असलेल्या पाणीपट्टी ‘अभय योजनेचा` लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे आता केवळ आजच्या एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या योजनेची अंतिम मुदत शुक्रवार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपत आहे. थकीत पाणीपट्टीची रक्कम एकरकमी भरल्यास विलंब शुल्कात १०० टक्के माफी मिळवण्याची ही शेवटची सुवर्णसंधी आहे.

नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दि. ०६ ऑगस्ट २०२५ ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे, त्यांनी थकीत आणि चालू पाणीपट्टीची रक्कम एकाच वेळी जमा केल्यास, त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या विलंबित आकारामध्ये (Late Fees/Penalty) पूर्णतः १०० टक्के माफी दिली जाणार आहे. महानगरपालिकेने सर्व थकबाकीदार नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या संधीचा तातडीने लाभ घ्यावा. उद्याच्या अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत विलंब शुल्क माफ केले जाणार नाही. नागरिकांनी वेळेवर कर भरून महापालिकेच्या विकासकामांमध्ये सहकार्य करावे.

सर्व थकबाकीदार नागरिकांना तात्काळ आपले थकीत पाणी बिल एकरकमी भरून १००% विलंब शुल्क माफीचा लाभ घेण्याचे व महानगरपालिकेच्या विकासकामात सहकार्य करण्याचे आग्रहाचे आवाहन

महापालिका आयुक्त सत्यम गांधी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button