
सांगली, ता.३० : उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून, पालकमंत्री कार्यालयाद्वारे (GMO) सांगलीतील प्रभाग क्रमांक १७ मध्ये ‘योजना साक्षरता शिबीर’ व ‘पालकमंत्री सेवा सुविधा शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. या शिबिरास सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट देऊन पाहणी केली.
या उपक्रमांतर्गत परिसरातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत, मतदार नोंदणी, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, तसेच आधार व पॅन कार्ड संबंधित सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी व त्याचा लाभ घेता यावा हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
यावेळी पालकमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक श्री. विजय वरूडकर, पालकमंत्री प्रतिनिधी प्रमुख श्री. नरेंद्र यरगट्टीकर, श्री. उदय मुळे, जगवल्लभ पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. के.के.शहा, श्रीकांत पाटील, भाजपा सांगली मध्य मंडल अध्यक्ष श्री. राहुल नवलाई, श्री. रामकृष्ण चितळे, श्री. अनिल मालेकर, श्री. सुमंत कुलकर्णी, श्री. शरद शहा, डॉ. कुर्हेकर, श्री. अरुण कणसे, श्री. संजय भोसले, श्री. सुनिल कोकितकर यांच्यासह आदी मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.