कुपवाड एमआयडीसीत प्रतिबंधित गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल, ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कुपवाड, ता.३०: महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू यांची वाहतूक करणाऱ्या एकावर कुपवाड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५३,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये मुद्देमालासह वाहतुकीसाठी वापरलेल्या दुचाकीचाही समावेश आहे.
शिवानंद बाळासाहेब न्यामगौडर (वय ३०, रा. कागवाड, ता. कागवाड, जि. बेळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल अरुणराव पवार (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कुपवाड एमआयडीसी परिसरातील प्लॉट नं. जे-६७ समोरील रस्त्यावर करण्यात आली. आरोपी शिवानंद न्यामगौडर हा त्याच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून (क्र. KA 23 EQ 5874) प्रतिबंधित अन्नपदार्थांची (पान मसाला व तंबाखू) विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना आढळून आला.
या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी १३,४३० रुपये किमतीचा 'विमल' पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली ४०,००० रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ५३,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीवर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोळेकर मॅडम या करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button