कुपवाड प्रभाग क्रमांक ८ मध्ये रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ; नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

कुपवाड, ता.३०: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८ मधील रघुवंश सोसायटी आणि सानेगुरुजी सोसायटी येथील अंतर्गत रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या भागातील अंतर्गत रस्त्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विष्णू अण्णासाहेब माने यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, अखेर या कामाला सुरुवात झाली आहे.या नवीन रस्त्यांमुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

या शुभारंभ कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. पद्माकर जगदाळे सर, मातोश्री लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने,माजी नगरसेवक श्री. विष्णू अण्णासाहेब माने, माजी नगरसेवक अथहर नायकवडी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आकाश माने, माजी नगरसेविका भरतीताई भगत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यांच्यासह मा. विकास जाधव, दादासो कोळेकर, मा. खरात साहेब, मा. तोडकर सर, अँड. सिद्धेश्वर ओलेकर, मा. धोंडीराम आण्णा माने, वसंत पाटील, सुमित पाटील, शैलेश म्हेत्रे, प्रदीप यादव, गजानन कोळेकर, सदा पाटील, तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला भगिनी, कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button