कुपवाड पोलिसांची कारवाई; ५३ हजारांहून अधिक किमतीचा २ किलो गांजा जप्त, दोघांना अटक

कुपवाड, ता.२८ : अमली पदार्थ विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना कुपवाड पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याकडून तब्बल दोन किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांज्याची बाजारपेठेतील किंमत ५३ हजार १२५ रुपये आहे. सदर कारवाई (ता.२८) रोजी पहाटे १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास कुपवाड परिसरातील फॉरेस्ट ऑफिस ते दत्तनगर रस्त्यावर असलेल्या हॉटेल वैभवसमोर करण्यात आली. या कारवाईत धोपल उर्फ डोक्या महिमान्या काळे (वय २५, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सावळी, ता. मिरज) , कान्या शिवाजी पवार (वय ४५, रा. मायाक्का मंदिर जवळ, कवलापूर, ता. मिरज) ताब्यात घेतलेल्या संसयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रवीण मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल वैभवजवळ सापळा रचुन संशयीत धोपल काळेकडील पिशवीतुन १ किलो ३८० ग्रॅम (किंमत ३४,५०० रुपये) तर कान्या पवार याच्याकडील पिशवीतून ७४५ ग्रॅम (किंमत १८,६२५ रुपये) गांजा सदृश्य वनस्पतीचा फुल-पाला बोंडे असा एकूण २ किलो १२५ ग्रॅम वजनाचा ५३ हजार १२५ रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे. या पुढील तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गाडवे व कुपवाड पोलीस करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button