कुपवाडमध्ये शिक्षकाच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरी; साठ हजार किमतीची ॲक्टिव्हा आणि लॅपटॉप लंपास

कुपवाड, ता.२८: येथील कृष्णा हौसिंग सोसायटी परिसरात एका शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या चोरीमध्ये होंडा कंपनीची ॲक्टिव्हा दुचाकी आणि एक लॅपटॉपचा समावेश आहे. याप्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन महादेव घाटे (वय ४६, व्यवसाय – शिक्षक, रा. कृष्णा हाऊसिंग सोसायटी, कुपवाड) यांनी या पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांची अधिक माहितीनुसार फिर्यादी घाटे यांच्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास हरिप्रिया हॉलसमोर, मोरया भोजनालयाच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या ‘रश्मिगंधा’ बंगल्यामध्ये ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातून ४० हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी (एमएच १० डीपी ५७२३) आणि २० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप असा एकूण ६०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच (ता.२८) रोजी पहाटे १.४४ वाजता एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. जाधव व कुपवाड पोलीस करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button