जतच्या विकासाला ‘देवाभाऊ’ंची गती! पंचायत समितीच्या अत्याधुनिक इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात १४.५६ कोटी मंजूर – आमदार गोपीचंद पडळकर (जत)

जत (सांगली) , ता.२८: जत मतदारसंघाच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, येथील पंचायत समितीच्या अत्याधुनिक इमारतीच्या ३० कोटी रुपयांच्या भव्य आराखड्याला मूर्त रूप देण्यासाठी पहिल्याच टप्प्यात तब्बल १४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जनतेच्या मागणीनुसार हा निधी मंजूर झाल्यामुळे जतच्या विकासाच्या वाटचालीला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

या विकासकामांमध्ये स्थानिक नेतृत्वाने मोठी भूमिका बजावली असून, ‘विकासाचे दुसरे नाव म्हणजे देवाभाऊ’ हे जनतेचे मत सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत ‘२८८ क्रमांक असलेला जत मतदारसंघ माझ्यासाठी पहिल्या क्रमांकाचा आहे, त्याला काही कमी पडू देणार नाही’ असे आश्वासन दिले होते. या निधी मंजुरीमुळे ते आश्वासन आता पूर्ण होताना दिसत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर जत

मंजूर झालेला हा निधी केवळ एक इमारत बांधण्यासाठी नाही, तर जतच्या नागरिकांना आधुनिक सुविधांनी युक्त प्रशासकीय केंद्र उपलब्ध करून देणारा आहे. ३० कोटींच्या एकूण आराखड्यातील १४.५६ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मिळाल्याने, पंचायत समितीची इमारत आता केवळ भक्कम बांधकाम नसेल, तर ती जतच्या भविष्यकालीन विकासाची आणि प्रशासकीय कार्यक्षमतेची भक्कम प्रतीक ठरेल. या विकासकामाबद्दल जनतेने आनंद व्यक्त केला असून, स्थानिक नेतृत्वाने (देवाभाऊ) जनतेच्या विश्वासाला उतरदायी ठरत, हा निधी खेचून आणल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, ग्रामविकास खात्याचे मंत्री ना. जयाभाऊ गोरे यांचेही विशेष आभार मानले जात आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button