भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी नागरिकांनी सक्रिय व्हावे; दक्षता सप्ताहानिमित्त एसीबीचे आवाहन

२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा

मुंबई, ता.२७ : केंद्रीय दक्षता आयोगामार्फत (Central Vigilance Commission) यंदा २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत देशभर ‘दक्षता जनजागृती सप्ताह-२०२५’ (Vigilance Awareness Week) साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने, राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सचोटी आणि पारदर्शकतेची भावना रुजवण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

या संदर्भात, अपर पोलीस आयुक्त (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – ACB), बृहन्मुंबई विभाग, मुंबई, संदीप दिवाण यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. कोणताही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास, त्याची माहिती त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचारविरोधी तक्रारीसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक

सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करताना एसीबीने तक्रारी नोंदवण्यासाठी खालील संपर्क तपशील उपलब्ध करून दिले आहेत:

  • संपर्क क्रमांक: 24921212
  • टोल फ्री क्रमांक: 1064
  • व्हॉट्सअप क्रमांक: 8828241064
  • ईमेल आयडी: addicpacbmumbai@mahapolice.gov.in

भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात नागरिकांचे सक्रिय सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. देशातील सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सचोटी वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोग दरवर्षी हा सप्ताह आयोजित करतो.

अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button