सांगली / प्रतिनिधी

सांगली, ता.२७: जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (UPRTO) नोव्हेंबर २०२५ या महिन्यात ‘शिकाऊ’ (Learner’s) आणि ‘पक्की’ (Permanent) अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) संबंधित कामकाज पूर्ण करण्यासाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ संबंधित तालुक्यातील नागरिकांना घेता येणार आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे. नोव्हेंबर महिन्यात खालीलप्रमाणे तालुकानिहाय शिबिरांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
तालुकाशिबिराची तारिख (नोव्हेंबर २०२५)
- इस्लामपूर ३ व १७ नोव्हेंबर
- विटा ७, १८ व २७ नोव्हेंबर
- कडेगाव १० व २५ नोव्हेंबर
- पलूस ११ व २६ नोव्हेंबर
- आष्टा १२ व २८ नोव्हेंबर
- आटपाडी१९ नोव्हेंबर
- जत १३ व २४ नोव्हेंबर
- शिराळा ४ व २० नोव्हेंबर
- तासगाव ६ व २१ नोव्हेंबर
- कवठेमहांकाळ१४ नोव्हेंबर
संबंधित नागरिकांनी त्यांच्या कामाच्या सोयीनुसार निश्चित केलेल्या तारखांना आणि संबंधित शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या अनुज्ञप्तीचे कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.