सांगली-कुपवाडचा पाणी पुरवठा विस्कळीत नागरिकांनी मंगळवारीच पाण्याचा साठा करून ठेवावा; गुरुवारपासून पुरवठा पूर्ववत होणार

माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक दुरुस्तीचे काम

सांगली, ता.२७: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पाणी पुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि अखंडित ठेवण्यासाठी मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी माळबंगला जलशुद्धीकरण केंद्र (Water Treatment Plant) येथे अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांतर्गत एसीबी (ACB) पॅनल, ट्रान्सफॉर्मर तसेच इतर तांत्रिक उपकरणांची महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी जलशुद्धीकरण केंद्र सकाळी १०.०० वाजेपासून सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वरील दुरुस्ती कामांमुळे बुधवार २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सांगली शहर, कुपवाड शहर भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही किंवा तो अपुरा/कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तर गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ पासून संबंधित भागांमध्ये नियमित पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होईल.

मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी मिळणाऱ्या पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.

कार्यकारी अभियंता श्री. चिदानंद कुरणे (पाणी पुरवठा विभाग)
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button