तासगाव-कुमठे फाटा रस्त्याची दुरवस्था

सांगली, ता.२७ : तासगाव ते कुमठे फाटा या मार्गाची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, तसेच नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे, ज्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. रात्रीच्या वेळी तर प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. यामुळे मोठी दुर्घटना किंवा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, तसेच वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

वारंवार होणाऱ्या त्रासामुळे संतप्त झालेल्या वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी तीव्र मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button