
सांगली, ता.२६: होरायझन हॉस्पिटल, सांगली येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या डॉ. राहुल सुर्वे आणि डॉ. नेहा सुर्वे यांचे “ओमेगा केअर” आय.सी.यु आणि क्रिटिकल केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा व दीपप्रज्वलन सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते बुधवारी (ता.२२) करण्यात आला.
हे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि मानवतेच्या भावनेने प्रेरित असून या हॉस्पिटलच्या माध्यमातून जनतेपर्यंत गुणवत्तापूर्ण आणि सुलभ सेवा पोहोचवण्याचा संकल्प डॉक्टर सर्वे यांचा आहे. यासाठी त्यांना भावी वाटचालीस आमदारांनी शुभेच्छा दिल्या आणि अशीच त्यांच्या हातातून रुग्णांची सेवा घडो अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. शिरीष काळे, डॉ.शोभा काळे डॉ.श्रीनिकेतन काळे, डॉ.शिल्पा काळे, डॉ. आशिष मगदूम आदी सुर्वे परिवार, हॉस्पिटल कर्मचारी मान्यवर उपस्थित होत