इचलकरंजी शहरात एसएन गँग विरुद्ध कठोर कारवाई

इचलकरंजी, ता.२५: शहरात गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून, याचाच भाग म्हणून एसएन गँग विरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गँगचा प्रमुख सलमान नदाफसह सहा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी यास मंजुरी दिली आहे. या टोळीने एका महिला फिर्यादीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. तपासात या टोळीविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी आणि हिंसाचार अशा स्वरूपाचे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button