होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला अहिल्यानगरमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तेजश्री चव्हाण ठरल्या विजेत्या!

कुपवाड, ता. २४: येथील अहिल्यानगर परिसरातील महिलांच्या कला-कौशल्याला आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने साथीदार यूथ फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडांगणावर रंगलेल्या या स्पर्धेत वसंतनगर येथील तेजश्री चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावून ‘होम मिनिस्टर’चा किताब जिंकला, तर एस. टी. कॉलनी येथील महादेवी कुरणे यांनी द्वितीय स्थान मिळवले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ई-दुचाकी भेट म्हणून प्रदान करण्यात आली.

पैलवान चेतन ऊर्फ ऋषिकेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली साथीदार यूथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

महिलांना मनोरंजनासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रिंग खेळणे, दोरा ओवणे, दोरीउड्या, चेंडू खेळणे, फनी गेम्स, उखाणा घेणे, म्हणी ओळखणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या उत्साहाने यात भाग घेत संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आणली.

यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर प्रशांत पाटील, मोहन जाधव, माजी नगरसेवक गजानन मगदूम, संजय यमगर, भाजप कामगार आघाडीचे अविनाश मोहिते, भाजपाचे माजी शहराध्यक्ष रवी सदामते, शिवसेनेचे बजरंग पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button