
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेले ५० वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या ४ महिन्यात पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर आणि इस्लामपूर नगरपरिषदेचे “उरण ईश्वरपूर” असा नामांतरणाबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सांगली जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने ‘इस्लामपूरचे ईश्वरपूर’ असे नामांतर करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती.
आता पुढील टप्प्यात
इस्लामपूर नगरपरिषदेचे नामकरणही “उरण ईश्वरपूर नगरपरिषद” असे करण्यात येणार आहे.
इस्लामपूरचे ईश्वरपुर नामकरण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार मानले आहेत. तसेच केंद्र शासन, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, सांगलीचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचे देखील आभार मानले आहेत.