सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कौतुकास्पद कामगिरी; एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा छडा, बालक सुखरपपणे आईकडे केले सुपूर्द.

सांगली, ता.२४: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कौतुकास्पद कामगिरी. एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे. बालकाला सुखरपपणे परत मिळवण्यात यश आले असून आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज, वय ४३ वर्षे, रा. किल्ला भाग, मिरज, ता. मिरज, जि. सांगली या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर सदर गुन्ह्यातील इम्तीयाज पठाण व वसीमा इम्तीयाज पठाण हे परागंदा आहेत. इम्तीयाज पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पोलिसांची अधीक माहिती अशी की, २० ऑक्टोबर ते २१ च्या दरम्यान एक वर्षाचा बालकाचे अज्ञात्यांनी अपहरण केले होते. याबाबत विश्रामबाग पोलीसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ सतीश शिंदे यांना केले. त्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ पंकज पवार यांचे पथक अज्ञात्याच्या शोधासाठी रवाना झाले. पथकातील पोहेकों / संदीप नलावडे व पोहेका / अमीरशा फकीर यांना तांत्रिक विश्लेषणाब्दारे तसेच गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रामबाग चौकातुन अपहरीत झालेले बालक हे इनायत गोलंदाज, इम्तीयाज पठाण व वसीमा खान यांनी सदर बालकाचे अपहरण केले आहे. इनायत गोलंदाज यास मिरज येथून ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता, इम्तीयाज पठाण व वसीमा खान यांनी मिळून विश्रामबाग चौकातुन १ वर्षाचे बालकाचे अपहरण केले होते तसेच सदरचे बालक हे सध्या रत्नागिरी जिल्हयातील सावर्डे गावात असलेल्याचे सांगितले. नमूद ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रत्नागिरी जिल्हयात स्थानिक पोलीस ठाणेची मदत घेवून सदर अपहरीत बालकाचा शोध घेतला असता, सदरचे बालक सावर्डे गावातील सचिन राजेशिर्के यांचे ताब्यात मिळून आले. त्यांचेकडे सदर बालकाबाबत चौकशी केली असता, त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांना वसीमा पठाण हिचे मदतीने इनायत गोलदांज, इम्तीयाज पठाण यांनी कायदेशीर प्रक्रिया करून मुल आपणास मिळवून देतो असे खोटे सांगुन पैसे घेतले होते. दिवाळीच्या मुहुर्तावर नमुद इसमांनी बाळ त्यांचे ताब्यात देवून दिवाळीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू असे खोटे सांगुन बाळ त्यांचे ताब्यात दिले होते. सदर बालकाची वैदयाकिय तपासणी करून त्यास मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, कल्पना बारवकर, यानी आईवडीलांचे ताब्यात दिले आहे. आपल्या मुलाला सुखरुपपणे तीन दिवसानंतर पाहिल्यानंतर बालकाचे आईवडीलांना अश्रु लपवता आले नाही. त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहे.

सदर बालकाची वैदयाकिय तपासणी करून त्यास मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, कल्पना बारवकर, यानी आईवडीलांचे ताब्यात दिले आहे. आपल्या मुलाला सुखरुपपणे तीन दिवसानंतर पाहिल्यानंतर बालकाचे आईवडीलांना अश्रु लपवता आले नाही. त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले. संशयीत आरोपी इनायत गोलंदाज यास पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.

इम्तीयाज पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी खंडणी, फसवणुक, विनयभंग, दुखापत तसेच आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. इम्तीयाज पठाण व वसीमा खान यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button