बँकेत दावा न केलेली रक्कम मिळविण्यासाठी महामेळावा

सांगली, ता.२२: जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून बँकेमध्ये दावा न केलेल्या १७६ कोटी रुपये असणाऱ्या ७,७५,३१५ खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी स्व. वसंतदादा पाटील सभागृह, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली येथे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये ज्या लोकांच्या ठेवी बँकेमध्ये दावा न करता पडून आहेत अशा सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ यांनी केले आहे. खातेदारांनी आवश्यक कागदपत्र जसे की बँकखाते पुस्तक, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी सोबत आणावे.

या मेळाव्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या महामेळाव्यामध्ये राज्यस्तरीय बँकर्स समितीचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँक अधिकारी, विविध विमा कंपन्याचे प्रतिनिधी तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button