
मिरज, ता.२२: येथे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्याहस्ते माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या अयोजनात प्रभाग क्रमांक ८ मधील स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा विभाग, इलेक्ट्रिक विभाग, मनपा कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त भेटवस्तू व फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आकाश बिराजदार ॲथलेटिक्स, अमृता राजाराम वावरे MBBS मिरज, सुजल चदनांशिवे मेकॅनिकल इंजिनिअर, रेवती साळुंखे ज्युडो भोपाळ, यांचा विविध क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये लक्ष्मीबाई आण्णासाहेब माने, महापौर नितीन सावगावे सर, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर साहेब, एसआय सिद्धार्थ ठोकळे, एसआय अतुल आठवले, याकूब मद्रासी, अश्विन पाटील, जितेंद्र हेगडे, राहुल कांबळे मुलानी, लोखंडे पाणीपुरवठा, दादासो कोळेकर, आशुतोष धोत्रे, गजानन कोळेकर, संजय काबुगडे, मुकादम प्रकाश चव्हाण, मुकादम संजय आयावळे, आदी होते.