
महाराष्ट्र, ता.२०: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभा सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केला आहे. या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात, ज्याचा उद्देश लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी निधी देणे हा आहे. मागील काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून निधीची मागणी होत होती, आणि उपलब्ध निधी आणि मागणी यामध्ये समतोल राखत, सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी आमदारांना दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी वितरित झाल्याने दलित वस्त्यांतील विकासकामांना गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे दलित वस्त्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते बांधणी आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.