
सांगली, ता.२०: मिरज-सांगली रोडवर रवीवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव विश्वजीत दिलीप नाईक (२१ वर्षे, रा. डी मार्ट पाठीमागे, सांगली) अशी झाली आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती अशी आहे की, विश्वजीत नाईक आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने वाहनाचे नियंत्रण गमावले. त्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी जाहिरात फलकावर आदळले, यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. या धडकेत विश्वजीत नाईकचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची अधिक चौकशी सुरू केली आहे.