नागरिकांनी पाणी जपून वापरावे
सांगली, ता.२०: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, हिराबाग येथील जुन्या टाकीच्या ७०० मिमी (700mm) आऊटलेट मेन लाईनवरील व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाल्याने त्या ठिकाणी तातडीची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या अत्यंत आवश्यक दुरुस्ती कामामुळे संबंधित झोनमधील काही भागांमध्ये आज दिवसभर पाणी पुरवठा अपुरा किंवा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. दुरुस्ती कामामुळे ह्या भागावर पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार खणभाग, गावभाग, वखारभाग, गणेशनगर, सिद्धार्थ परिसर तसेच हिराबाग टाकीच्या झोनमधील इतर परिसर या भागात होणार आहे.
दुरुस्तीचे काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आज रात्रीपासून नियमित पाणी पुरवठा सुरू होईल. तोपर्यंत नागरिकांनी मिळणारे पाणी काटकसरीने व जबाबदारीने वापरावे, तसेच महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
🚰 टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था:
दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत गरजेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील पाईप निरीक्षकांशी संपर्क साधावा:
अधिकारी संपर्क क्रमांक
श्री. गोपी (पाईप निरीक्षक) 📞 ८६६९०८८१२५
श्री. साळुंखे (पाईप निरीक्षक) 📞 ९२८४५५१०९६
नागरिकांना आवाहन:
“दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू असून, नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, पाणी जपून वापरावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे कार्यकारी अभियंता श्री. चिदानंद कुरणे (पाणी पुरवठा विभाग)