जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंत्रणांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

सांगली, ता.१८: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत कार्यान्वयीन यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध राज्यस्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे सन 2025-26 च्या प्रशासकीय मान्यताप्राप्त कामे सुरू करण्याचे आदेश देऊन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनांतर्गत कामांना, योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत होती. त्याला एक महिना मुदतवाढ मिूळून जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रातील योजनांतर्गत जिल्हास्तरीय कामांकरिता तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित अवधी पाहता व तसेच सुटीचा कालावधी लक्षात घेता सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करावी. यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत जिल्ह्यातील विविध राज्यस्तरीय कार्यान्वयीन यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस दल, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती, अर्थसंकल्पिय तरतूद आदिंचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादरीकरण केले. यावेळी जिल्ह्यातील राज्यस्तर यंत्रणा, जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभाग, महानगरपालिका आदिंसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button