आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण; मिरज शासकीय रुग्णालयात अग्निशमन प्रात्यक्षिकांचे आयोजन

सांगली, ता.१८: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार आज (दि. १६ ऑक्टोबर २०२५) मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महत्त्वपूर्ण अग्निशमन विषयक माहिती व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.

प्रात्यक्षिकाचे महत्त्वाचे मुद्दे

  • अग्निशामक यंत्रांचा (Fire Extinguisher) नेमका वापर कसा करावा, याचे सविस्तर मार्गदर्शन.
  • एलपीजी सिलेंडरला आग लागल्यास, ओल्या कॉटन कापडाच्या साहाय्याने ती आग सुरक्षितरित्या कसी विझवावी याचे प्रात्यक्षिक

या महत्त्वपूर्ण उपक्रमात एमबीबीएस व नर्सिंग प्रथम वर्षातील विद्यार्थी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, तसेच रुग्णालय अधिकारी आणि स्टाफ अशा एकूण सुमारे १५० जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अग्निशमन विभागाने दिलेल्या या माहितीचा आणि प्रात्यक्षिकाचा उपयोग कामाच्या ठिकाणी तसेच घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत निश्चितपणे होईल. महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “चला, अग्निसुरक्षेचे पालन करूया – अग्निसुरक्षा सुनिश्चित करा, जीव वाचवा, मालमत्ता वाचवा.”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button