
तासगाव, ता.१६: येथील इंदिरानगर झोपडपट्टीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून या शुल्लक कारणाने नशेत असणाऱ्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा तलवारीने भोसकून निर्घृण खून केला. सदर घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. जगणं चरण पवार, वय ४४ वर्ष, असे खून करणाऱ्या संशयीताचे नाव आहे. यात मयत झालेल्या जन्मदात्या आईचे नाव शांताबाई चरण पवार आहे. सदर घटनेची तासगाव पोलीसांत नोंद झाली आहे. यापुढील आधील तपास तासगाव पोलीस करीत आहे.