
आयुक्तांचा दणका सांगली महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही
आज कोल्हापूर रोडवरील 20 बाय 40 मापाचा होर्डिंग्ज सांगाडा उपआयुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने हटविला.
महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण 31 होर्डिंग्ज अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे.