
फिटनेस विलंब दररोज “ 50/- रूपये दंडाने ” पुन्हा डोकं वर काढलंय…!!
महाराष्ट्र राज्यातील तमाम मोटार वाहनचालकांच्या विलंब फिटनेसकरिता फिटनेस संपल्यादिवसापासून “रोजचे 50/- रुपयांचे दंड ” लावण्याचे परिपत्रक दि.07/05/2024 रोजी परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी काढले आहेत…
परिपत्रक दि.07/05/2024 रोजी निघाले.. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकांच्या शेवटच्या दिवशी अर्थात दि.20/05/2024 रोजी परिवहन विभागांने त्याची अंमलबजावणीची सुरुवात केली…
संयुक्त महासंघाच्या ” फिटनेस विलंब दंडाच्या संदर्भात “ केंद्रीय परिवहन विभागाच्या वेबसाईटवर विविध जिल्हातून हरकती नोंद केलेल्या होत्या ” तसेच राज्यस्तरीय पातळीवर या विषयी निवेदन, आंदोलन करण्यात आलेली होती…
पण दि.20/05/2024 पासून वाहन ऑनलाईन प्रणालीमध्ये मोटार वाहन धारकांचे फिटनेस संपल्यापासून रोजचे 50/-दंड आकारण्यात येईल.