
सांगली महापालिकेची घरपट्टीची बिले आता ऑनलाईन भरता येणार असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची घरपट्टीची बिले आता ऑनलाईन भरता यावीत यासाठी ५ बिल भरणा केंद्रे आणि २३ कलेक्शन कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आले .
या सर्वाना पॉस ( POS) मशिन देण्यात आली आहे. त्यामुळे या सेवेद्वारे नागरिक आपली घरपट्टीची बिले ऑनलाईन भरून आपली गैरसोय टाळू शकतात.
नागरिकांच्या सोयीसाठी मनपाची सर्व नागरिक सुविधा केंद्र शनिवार रविवार सुद्धा सुरू .
https://propertytax.smkc.in/ या लिंक द्वारे नागरिकांनी घरी बसून आपली मालमत्ता कर भरता येईल .
तसेच ३० जूनपूर्वी घरपट्टी भरल्यास नागरिकांना १०% सवलत मिळेल व जुलै नंतर 5 % सवलत असे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले.
धनादेश द्वारे रक्कम भरणाऱ्या नागरिकांचे धनादेश न वाटल्यास रुपये 500 /- पर्यंत दंड होऊ शकतो.
नागरिकांना पेमेंट करण्यासाठी ऑनलाइन मोड जसे क्रेडिट,डेबिट कार्ड ,यूपीआय पेमेंट इत्यादी उपलब्ध आहे.
फक्त ई बिल व ई रिसीट वापरण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या नागरिकांना सामान्य करात सवलत देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी ऑनलाईन किंवा भाग लीपिकाकडे नोंद करावी.