
सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील जी बांधकामे अनधिकृत व विनापरवाना उभारली आहेत ते हटवून मालमत्ता करही दंडासह वसूल केला जाईल. महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाले, ओत व पूरपट्ट्यात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी महापालिकेचा परवाना न घेता बांधकामे केली आहेत तर काही ठिकाणी महापालिकेच्या चुकीच्या परवान्याच्या आधारे बांधकामे झाली आहेत. अशा बांधकामांच्या नोंदी महापालिकेकडे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामे कोणत्याही परिस्थितीत हटविण्यात येतील, मात्र त्यांच्याकडून कर व दंड वसूल केला जाईल, असे आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.