
कुपवाड , ता.13 : औधोगिक क्षेत्रालगत असणाऱ्या परिसरात एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात कुपवाड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना रविवारी (ता.१२) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली आहे. याबाबत पीडितेने स्वतः फिर्याद दिली असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित अल्पवयीन ही औधोगिक क्षेत्रालगत असणाऱ्या परिसरातील रहिवासी आहे. त्याच परिसरातील अडतीस वर्षीय तरुणाने तिच्याशी जवळीक साधली. तुझी घरची परिस्थिती गरीब आहे. आई व आज्जी दोघीही कामाला जातात. मी तुला महिना १०,०००/- रुपये देतो. तू माझ्या बरोबर येत जा. असे सांगत मनाला लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य करून पीडितेचा विनयभंग केला. घटनेनंतर प्रकाराची फिर्याद पीडितेने कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.